अजित जगताप :
वडूज : प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात सुरू झाली आहे. प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट व्हायरल होत असल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. खटाव मध्ये सभासद परिवर्तन पॅनलच्या पाठीशी शिक्षक सभासदांचे ‘बल’ मिळाल्याने प्रचार यंत्रणेचा उत्साह वाढला आहे.
प्राथमिक शिक्षक संघ, समिती, जुनी पेन्शन संघटना व दोंदे गट असे तीनही एकत्रित आल्याने सभासद परिवर्तन पॅनेलच्या मताधिक्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. किमान तीन ते साडेतीन हजार मतांच्या फरकाने सर्व एकवीस जागा निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात, उदय शिंदे, मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील व इतर मान्यवरांनी सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षिका सभासदांना आपली भूमिका विषद केली आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
सभासद परिवर्तन पॅनेलचे अनुसूचित जाती गट- ज्ञानबा ढापरे,इतर मागासवर्गीय गट-किरण यादव, भटके विमुक्त जाती गट-नितीन काळे व महिला राखीव गट- पुष्पलता बोबडे, निशा मुळीक, सर्वसाधारण खटाव गटातील नवनाथ जाधव, मायणी गटातील आबासाहेब जाधव या दोन्ही जाधवांनी ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सभासदांच्या गाठीभेटी घेऊन एकजुटीने प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘कप नि बशी,निश्चितच होणार सरशी’ असेच समीकरण संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. विश्वभर रणनवरे, चंद्रकांत यादव, दिपक भुजबळ व संगिता सणस यांच्यासह पुसेगाव, मोळ, बुध, वडी, डिस्कळ, विसापूर, पुसेगाव, निढळ,सिद्धेश्वर किरोली, गोपूज, एनकुळ,कुमठे, वडूज, कातर खटाव, खटाव, खातगुण, कडगुण, ललगुण, मांडवे,पुसेसावळी, मायणी, म्हासुणे,कलेढोण येथील शिक्षक-शिक्षिका व सेवानिवृत्त सभासद स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत आहेत. आपल्या घरातील उमेदवाराला विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार सभासदांनी केला असल्याचे प्रथमच दिसून आले आहे.
यावेळी राम चव्हाण, माजी संचालक र. मू चव्हाण, माजी सरचिटणीस विठ्ठल फडतरे, जिल्हा प्रतिनिधी दिलीप पवार, दीपक घनवट, विजय गोरे,सेवानिवृत्त शिक्षक हनुमंतराव घनवट, दशरथ घनवट, ज्योतीराम घनवट, गोरख पवार, नितीन खोत, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बाळकृष्ण जगताप, दिलीपराव काळंगे, शंकर जाधव, जयश्री गोडसे, रेखा कोरडे, कीर्ती माने , शशिकला करणे, रूपाली माने, माधुरी गायकवाड, रवींद्र कुमार पवार, अनिल लावंड,सोमनाथ पाटोळे ,अमोल ढगे सागर माने, उमेश पाटील, अर्जून यमगर, विनोद गोडसे, रवी शास्त्री जाधव, नितीन घनवट व अन्य मान्यवर उपस्थित होते.