उरुळी कांचन : पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे नुकत्याच पार पडलेल्या अबॅकस स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ब्रेन मास्टर (एनआयबीएम) संस्थेचे 47 पैकी 23 विद्यार्थी विजेते झाले आहेत. यामध्ये उरुळी कांचन, लोणी काळभोर व शेवाळेवाडी येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशी माहिती उरुळी कांचन येथील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ब्रेन मास्टर (एनआयबीएम)चे अध्यक्ष नवनाथ हंबीर यांनी दिली आहे.
पुणे येथे गणेश कला क्रीडा मंच समर कॉम्पिटिशन अबॅकस ही स्पर्धा पार पडली. यामध्ये विविध गटातून विद्यार्थी बसले होते. यामध्ये उरुळी कांचन, लोणी काळभोर, शेवाळेवाडी येथील ही मुले आहेत. सहा मिनिटात 100 गणिते सोडवून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण ठरले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टरचे अध्यक्ष नवनाथ हंबीर, प्रशिक्षिका किरण शेळके, वैष्णवी शिंदे, ज्ञानेश्वरी साकोरे, क्षितिजा ठाकूर, काजल हाके, सिमा कुंभार ,आश्विनी पाटील ,क्षितीजा ठाकुर ,अनुष्का सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.
विविध गटानुसार विद्यार्थ्यांचे अनुक्रमांक पुढीलप्रमाणे :
उरुळी कांचन-
प्रथम क्रमांक – आर्या शेळके, देवांश चौधरी
द्वितीय क्रमांक: दर्शन मोरे
तृतीय क्रमांक: अमेय मून, स्वराली सावंत, सोहम टिळेकर, देवांश शिंदे, पृथ्वीराज कांचन
लोणी काळभोर-
प्रथम क्रमांक: श्रेयश पाटील, पूर्वी नलावडे
तृतीय क्रमांक: श्रीपाद नाळे, पृथ्वी चौधरी, श्लोक उबाळे, श्रेया काळभोर
शेवाळेवाडी-
प्रथम क्रमांक: विराज मोडक, आनंदी शितोळे, तन्मय रहाणे, स्वर्णिम जोशी
द्वितीय क्रमांक: अर्णव कलेल
तृतीय क्रमांक: कार्तिक घोगरे, अर्निका कलेल, शिवांश मोरे, अक्षत येरपुडे.