नवी दिल्ली : जागतिक बाजारातील सकारात्मक ट्रेंडनंतर राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचा भाव 50 रुपयांनी वाढून 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 72,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. यासोबतच चांदीचा भावही 300 रुपयांनी वाढून 91,300 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,550 रुपयांवर असून, जी मागील सत्राच्या बंदच्या तुलनेत 50 रुपयांनी वाढली आहे. बुधवारी सोन्याचा व्यापार एका मर्यादेत दिसून आला. जागतिक बाजारात कॉमेक्सवर सोन्याची स्पॉट किंमत 2,339 प्रति औंस होती. मागील तुलनेत चार डॉलरची थोडीच वाढ झाली आहे. जागतिक बाजारात चांदीचा भाव 29.80 डॉलर प्रति औंस होता.
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 72,180 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत थोड्याशा फरकाने जास्त होताना दिसत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 66,820 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,500 रुपयांवर गेले आहेत. सोने-चांदीचे दर कमी असो वा जास्त त्याची खरेदी करणारा एक विशेष असा वर्ग आहे. सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवावी लागते.