मुंबई : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबतचे हनिमूनमधील रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. मंगळवारी सायंकाळी सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये झहीरसोबत स्विमिंग पूलमध्ये चिल करतानाचे फोटो शेअर केले.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोजमध्ये झहीर-सोनाक्षी एका उंच इमारतीच्या स्विमिंग पूलमध्ये क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना सोनाक्षीने लिहिले, ‘Beautiful Sunsets‘ अशी कॅप्शन सोनाक्षीनं या फोटोला दिली आहे. तर सोनाक्षीनं दुसरा एक फोटो शेअर करीत ‘काय सुंदर दिवस आहे‘, असं कॅप्शनही दिलं आहे.
झहीरने हे फोटो पुन्हा शेअर केले आहेत आणि सोनाक्षीसाठी रोमँटिक कॅप्शनही लिहिले. सोनाक्षीच्या सौंदर्याच्या तुलनेत सूर्यास्त फिकट असल्याचे वर्णन करताना त्याने लिहिले की, ‘मी यापेक्षा जास्त सौंदर्य पाहिले आहे’. सोनाक्षी आणि झहीर हनिमूनसाठी बालीला गेल्याचे काही मीडिया रिपोर्ट्मध्ये म्हटलं जात आहे.
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून रोजी हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न न करता नोंदणीकृत विवाह केला. यानंतर, त्यांनी मुंबईतील बास्टन रेस्टॉरंटमध्ये लग्नाचे रिसेप्शन दिले ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.