पुणे प्राईम न्यूज : प्रवास करायला अनेकांना आवडते. मग ती लहान मुलं असो वा मोठ्या व्यक्ती. यात कुटुंबासह फिरण्यात एक वेगळा आनंद असतो. कमी खर्चात आणि खिशाला परवडेल अशा किंमतीत फिरायला जायचे असल्यास काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. येत्या काही दिवसांत तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर जाताना तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोबत घ्यायला विसरू नका. या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते आपण जाणून घेऊ…
स्मार्ट पॅकिंग –
पॅकिंग करताना, हे लक्षात ठेवा की तुम्ही कधीही तुमच्यासोबत असे कपडे घेऊ नका जे खूप हलके रंगाचे असतात आणि ते सहज घाण होतात, यामुळे तुम्हाला कपडे पुन्हा पुन्हा धुण्याच्या समस्येपासून वाचता येईल.
आधीच बुकिंग करा –
सध्याच्या डिजिटल युगात काही गोष्टी करणे सहज शक्य झाले आहे. यामुळे एखाद्या ठिकाणी पोहचण्यापूर्वी तेथील हॉटेल बुकिंग करून ठेवा. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उत्तम डिस्काउंटही दिले जाते. बजेट ट्रिपसाठी नेहमीच 3 स्टार हॉटेलचे बुकिंग करावे .
कार्डसोबत रोख पैसे ठेवा-
जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर लक्षात ठेवा की तुमच्यासोबत काही रक्कमही असली पाहिजे.
महत्त्वाची औषधे जवळ असावे-
बर्याच वेळा हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे डोकेदुखी, सर्दी, ताप इत्यादींवर औषधे असणे आवश्यक असते. तसे तुम्ही कुठेही बाहेर जाल तुमच्याकडे अशी औषधे असणे महत्त्वाचे आहे. कारण त्यांची कुठेही गरज भासू शकते.
खबरदारी-
तुम्ही कुठेही जात आहात त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती ठेवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकाल.