शिक्रापूर : जमिनीच्या कडेला केलेल्या कंपाउंडचे गज चोरी केल्याप्रकरणी बाप लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे घडली. याबाबत शिवाजी सुदाम मासळकर (वय ४२ रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाजीराव सदाशिव मासळकर व गणेश बाजीराव मासळकर (दोघे रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे) या बाप लेकांवर गुन्हा दाखल केला आहे.
जातेगाव खुर्द येथे शिवाजी मासळकर यांची जमीन असून त्यांनी त्यांच्या जमिनीच्या कडेला लोखंडी कंपाउंड केलेले असून सदर कंपाउंडचे काही लोखंडी गज चोरीला गेल्याचे शिवाजी यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी चौकशी केली. सदर जमिनीच्या कंपाउंडचे गज शेजारील बाजीराव व गणेश या बापलेकांना घेऊन जाताना शिवाजी यांच्या कुटुंबीयांनी पाहिले.