पुणे: पुणे शहरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात चालकाचे अपहरण केल्याचा दोघांवर येरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल यांनी चालकाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल आहे. पुणे न्यायालयाने अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि आजोबांना जामीन मंजूर केला आहे. परंतु, विशाल अग्रवाल याला इतर गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे.