नवी दिल्ली: नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 2001 मध्ये विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने सोमवारी पाच महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सक्सेनाला नुकसानभरपाई म्हणून 10 लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. व्हीके सक्सेना सध्या दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत.
पाटकर यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांना फारशी शिक्षा दिली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित करण्यात येईल, असे न्यायाधीशांनी सांगितले.