पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार असून, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष कर्तव्य अधिकारी, विशेष कार्य अधिकारी ही पदे आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 65 वर्षांपर्यंत व्यक्ती अर्ज करू शकणार आहे.
यामध्ये 8 जुलैला मुलाखत घेतली जाणार असून, ही मुलाखत विद्यापीठ मुख्यालय, नाशिक येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.