पुणे : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड, रायगड येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये वयोमर्यादही निश्चित करण्यात आली आहे.
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड, रायगड येथे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शिकाऊ (फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक) हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला तळोजा, रायगड जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 21 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट) अशी वयाची अट असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.hindustancopper.com/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
– पदाचे नाव : शिकाऊ (फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक)
– एकूण रिक्त पदे : 09 पदे.
– नोकरीचे ठिकाण : तळोजा, रायगड.
– शैक्षणिक पात्रता : आठवी, दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय.
– वयोमर्यादा : 21 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कनिष्ठ व्यवस्थापक (एचआर), हिंदुस्थान कॉपरचे कार्यालय लिमिटेड, तळोजा कॉपर प्रोजेक्ट, E33-36, MIDC, तळोजा – 410208.