सोलापूर : सोलापुरात २६ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. ३०) मध्यरात्री जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात घडली आहे. विनायक हाके असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने सोलापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विनायक हाके हा मूळचा मोहोळचा रहिवाशी आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापुरात त्याच्या आजीकडे विनायक आला होता. यावेळी जुने सोलापूर परिसरात कल्याणनगर मैदानात त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
तरुणाच्या हत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विनायकचा मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पंचनाम्यासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा सुरु आहे.