उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील शांताराम कोंडीराम चौधरी यांची पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या २०२२ ते २०२७ साठी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काल रविवारी (ता.६) पूर्ण झाली. ही लढत बँकेचे संस्थापक कैलास सखाराम कोद्रे यांचा सहकार पॅनल व माजी अध्यक्ष अशोक ज्ञानेश्वर पवार यांचा प्रगती पॅनल यांच्यात झाली. या निवडणुकीचा आज सोमवारी (ता.७) निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १५ उमेदवार बहुसंख्य मताधिक्याने विजयी झाले आहे.
दरम्यान, बँकेचे संस्थापक कैलास सखाराम कोद्रे यांचा सहकार पॅनल विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून जोरदार जल्लोष साजरा केला.
सहकार पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
१) कैलास सखाराम कोद्रे
२)अविनाश केरबा कवडे
३)शांताराम कोंडीराम चौधरी
४)कैलास रामचंद्र कोद्रे
५)संदीप कैलासराव कोद्रे
६) दिलीप महादेव जगताप
७)संजय विजय फटके
८)देवेंद्र सुरेश भाट
९)ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे
१०)साहेबराव विठ्ठलराव लोणकर
११)किशोर फत्तु संघेलिया
१२)मंगल शिवाजीराव टिळेकर
१३)स्मिता शैलेश लडकत
१४)अनिल जगन्नाथ आबनावे
१५)नंदकिशोर तुकाराम बिडकर