पुणे : मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात ईसीजी टेक्निशियन, प्रोस्थेटिक टेक्निशियन, ऑर्थोटिक टेक्निशियन, फार्मासिस्ट, कनिष्ठ व्यावसायिक थेरपिस्ट आणि सामाजिक विकास अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत एकूण 15 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, L.T.M.S च्या इनबाउंड आणि आउटबाउंड विभाग हॉस्पिटल या पत्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://portal.mcgm.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20,000 ते 40,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. यात अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 असणार आहे.