पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथे प्रकल्प समन्वयक, समुपदेशक आणि कार्यक्रम प्रशासक कर्मचारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, simha.abf.tdd@gmail.com येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.tiss.edu/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प समन्वयक, समुपदेशक आणि कार्यक्रम प्रशासक कर्मचारी.
– एकूण रिक्त पदे : 10 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र.
– शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, बी.कॉम.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 32,500/- ते रु. 82,500/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 28 जून 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2024.