मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी 10 नेत्यांच्या नावाची यादी दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या यादीमध्ये दोन महिला नेत्यांचाही समावेश आहे.
पुढील महिन्यात विधान परिषदेच्या 12 जागांसाठी मतदान होणार आहे. विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक या नेत्यांची नावे केंद्रात पाठवल्याची माहिती आहे.
राज्यात जुलैमध्ये 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलं आहे.