नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच IGI विमानतळावरील टर्मिनल 1 वर पहाटे मोठा अपघात झाला आहे. विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत आणि खांब गाड्यांवर कोसळले. या अपघातामध्ये 6 जण जखमी झाल्याचे समजते.
#WATCH | “A roof collapsed at Terminal-1 of Delhi airport. 3 fire tenders were rushed to the spot”, says an official from Delhi Fire Services
(Video source – Delhi Fire Services) pic.twitter.com/qdRiSFrctv
— ANI (@ANI) June 28, 2024
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता झाला आहे. कोसळलेल्या छताच्या मलब्या खालून सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अजूनही काही गाड्या छताखाली अडकल्या आहेत. अग्निशमन विभागाला सकाळी साडेपाचच्या सुमारास या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली.
#WATCH | Latest visuals from Terminal-1 of Delhi airport, where a roof collapsed amid heavy rainfall, leaving 6 people injured pic.twitter.com/KzxvkVHRGG
— ANI (@ANI) June 28, 2024
शुक्रवारी पहाटे झालेल्या संततधार पावसामुळं IGI विमानतळाच्या T-1 च्या छताचा काही भाग अचानक खाली पडला, त्यामुळं तिथे उभ्या असलेल्या कार टॅक्सी चालकांना त्याचा फटका बसला. घटनेची माहिती पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाला देण्यात आली. सध्या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर विभागांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
दिल्ली विमानतळावर झालेल्या या अपघातानंतर यासंदर्भातील एका व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे. या अपघाताचे काही फोटो, व्हिडीओही समोर आले असून छत कोसळल्यामुळे त्याखाली दबल्या गेलेल्या गाड्यांची काय दुरावस्था झाली आहे, त्याचे विदारक दृश्य त्यामध्ये दिसत आहे. धातूंच्या मोठमोठ्या खांबांखाली कार अक्षरशः चक्काचूर झाले आहे. या वेगवेगळ्या कारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुखरुप बाहेर काढून उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली अग्निशामन दलाने दिली आहे.
मुसळधार पावसामुळे सध्या दिल्ली विमानतळ अंशतः बंद ठेवण्यात आलेलं आहे, दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून तशापद्धतीची माहिती प्रावाशांना दिली जात आहे.
यावेळी दिल्ली अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली की, “सकाळी साडेपाचच्या सुमारास आम्हाला कॉलवरुन विमानतळावरील छत कोसळल्याची माहिती देण्यात आली. टर्मिनस 1 वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अग्निशामनदलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Due to bad weather (heavy rains), SpiceJet flights have been cancelled as Terminal 1 of Delhi Airport will remain partially closed for operations until further notice: SpiceJet pic.twitter.com/TfoQU7N2sI
— ANI (@ANI) June 28, 2024
“खराब हवामानामुळे (मुसळधार पाऊस) स्पाईसजेटची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पर्यायी ऑप्शनसाठी किंवा पूर्ण रिफंडसाठी आमच्याशी +91 (0)124 4983410/+91 (0)124 7101600 या नंबरवर संपर्क साधा किंवा http://changes.spicejet.com या वेबसाईटला भेट द्या. पुढील अपडेट्ससाठी आमच्या सोशल मिडिया चॅनलवर नजर ठेवा, असे स्पाईसजेटतर्फे सांगण्यात आले आहे.