OBC Reservation: महाराष्ट्र सद्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे तापले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे भूमिकेवर ठाम आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका म्हणून लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथील प्राणांतिक उपोषणावेळी ओबीसी प्रवर्गातून इतर कोणालाही आरक्षण दिले जाणार नाही, याची लेखी हमी सरकारे द्यावी, अशी मागणी केली होती.
ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीसंदर्भातही यावेळी चर्चा केली जाऊ शकते. त्यांच्या या मागणीवर 29 जूनच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार, अशी ठाम भूमिका घेत आक्रमक झाले आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील 13 जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे.
यापूर्वी राज्यात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाले होते तेव्हा राज्य सरकारने अशाचप्रकारे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण काहीप्रमाणात शांत झाले होते.
बीडमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण; काढला मूकमोर्चा
बीड जिल्ह्यात एका इंडिया बँकेच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. याविरोधात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पहाटे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मूक मोर्चा काढला होता. यावेळी इंडिया बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. तसेच तीन दिवसांपासून तक्रार दाखल होऊनही पोलिसांनी हल्लेखोराला अटक का केली नाही? असा सवाल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विचारला.
धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आज दुपारी बैठक
धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आज विधीमंडळात होणार बैठक. चौंडी येथील उपोषणकर्त्यांसोबत सरकार चर्चा करणार आहे. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी बोलावली तातडीची बैठक. आज दुपारी अतुल सावेंच्या दालनात दुपारी २ वाजता बैठक होणार आहेत. ओबीसी मंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राहणार उपस्थित, तसेच धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या यशवंत सेनेच्या प्रतिनिधींही चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे.