शिक्रापूर : बसल्या ठिकाणी अचानकपणे एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे घडली. रामकृष्ण बबनराव गोलांडे (वय ५४, रा. कारेगाव, ता. शिरुर जि. पुणे; मूळ रा. शिवाजीनगर, ता. लालबाग, जि. बुऱ्हानपूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत वैशाली रामकृष्ण गोलांडे (वय ५२, रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिवाजीनगर ता. लालबाग जि. बुऱ्हानपूर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रामकृष्ण गोलांडे व वैशाली गोलांडे हे दोघे जेवण करुन बसले असताना रामकृष्ण यांना अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी शिरुर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच रामकृष्ण गोलांडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजीव गायकवाड हे करत आहेत.