-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : येथील पळसनाथ विद्यालयात कोल्हापूर संस्थानाधिपती बहुजनपालक थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन विद्यालयाचे शिक्षक तानाजी इरकल यांच्या हस्ते करण्यात आले. आरक्षणाचे जनक, आर्थिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक सहकार, कला क्रीडा संगीत व्यापार, कृषी क्षेत्रातील भरीव योगदान असणारे छत्रपती शाहू महाराजांच्या आचार व विचारांचे आचरण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी शाहु महाराजांच्या जीवनावरती आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, तानाजी इरकल, बळवंत निंबाळकर, संदिप काळे, नितीन दशवंत, माजी प्राचार्य बाळु काळे, रामभाऊ गलांडे, सुवर्णा नायकवाडी, वृषाली काळे, उज्ज्वला वाघमारे, शुभांगी कोळी, सुदर्शना पवार, कीर्ती गायकवाड आदिंसह शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी उपस्थित होते.