पुणे : पुणे महानगरपालिकेने ड्रग्ज प्रकरणाचा आधार घेऊन सुरू केलेल्या कारवाईत आता भाजप आमदाराच्या चुलत भावाच्या कल्चर हॉटेलवर कारवाई करण्यात आली. पुणे महानगरपालिकेने मंगळवारी केलेल्या कारवाईत ९ ते १० हजार चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे. कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघातानंतर शहरातील पब आणि बारचा विषय ऐरणीवर आला आहे.
त्यातच दोन दिवसांपूर्वी एफसी रोडवरील हॉटेलमधील ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूवर पुणे महानगरपलिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार मंगळवार २५ जून रोजी पालिकेने एफसी रोडवरील बड्या हॉटेलवर कारवाई केली आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता ही कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.