अजित जगताप
सातारा : सातारा जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त शिक्षक करून प्राथमिक शिक्षकांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या शिक्षक बँक पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारा यंत्रणा सुरू केलेले आहे.त्यामध्ये सभासद परिवर्तन पॅनेलने गरुड भरारी मारली आहे. त्यामुळे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकेकाळी प्राथमिक शिक्षक बँकेचा आदर्श घेऊन इतरांनी सहकार क्षेत्रात पाऊल टाकले होते. गुरु ब्रह्मा,, गुरु महेश,,, गुरु विष्णू,, असं वर्णन केलेल्या शिक्षकांची बँक म्हणून साताऱ्यातील शिक्षक बँकेचा गवगवा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत होता.
अलीकडच्या चार वर्षाच्या काळात याच शिक्षक बँकेला ग्रहण लागले असून ज्या ठिकाणी बँकेमध्ये शिक्षक सभासद उजळ माथ्याने जात होते. त्याच शिक्षक बँकेत सत्ताधारी एका टोळक्यांमुळे बँकेला बदनामीचा सामना करावा लागला. आज शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्य अध्यक्ष उदय शिंदे, मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील तसेच मान्यवर शिक्षक वर्गाने आता बँकेच्या हितासाठी व रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
साताऱ्यातील श्री कुरणेश्वर मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करताना सभासद परिवर्तन पॅनल म्हणजे सातारा जिल्ह्यातील शिक्षक बंधू- भगिनी एकत्र आल्याचे पाहून अनेक नव्या जुन्या शिक्षकांना परिवर्तन संसार का नियम आहे. याची खात्री पटली आहे. सर्व उमेदवार आणि त्यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेणारे सर्व शिक्षक या मेळाव्याला एकत्र आले. त्यांनी शिक्षक बँकेचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी शपथ घेतली आहे. आज शिक्षक बँकेची आर्थिक प्रगती ही जुन्या लोकांच्या प्रामाणिकपणावर उभी राहिली होती. तिला रिव्हर्स टाकण्याचे काम बँकेतील सत्ताधारी मंडळींनी इमाने इतबारे करून ही निवडणूक लादलेली आहे.
खरं म्हणजे दहा हजार सभासदांच्या सभासद हितासाठी बँकेने काही बदल करणे अपेक्षित होते. परंतु व्यक्तिगत अर्थकारण करण्यासाठी सत्ताधारी मंडळीतील टोळक्यांनी नोकर भरती स्थगिती व पुन्हा त्यांचा समावेश करून या शिक्षक बँकेत ‘तिन्ही ऋतू ‘दाखवून दिले आहेत. मुळातच शिक्षक हा प्रामाणिक व इतरांना चांगली शिकवण देणारे असतात. हे जरी मान्य असले तरी शिक्षक बँकेच्या आर्थिक व्यवहार बघणाऱ्या संस्थेत चार वर्षात टोळक्यांचा धुडगूस झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. त्याबाबत सर्वांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ आली. शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्य अध्यक्ष उदय शिंदे, बलवंत पाटील व इतर मान्यवर नेत्यांनी बँकेचे हित पाहून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
संघ व समिती या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या एकत्र आल्यामुळे हे नाणे खणखणीत वाजत आहे. शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांना आता पराभव शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. हा जो सभासदांचा असंतोष आहे. त्यातून मिळणारी मताधिक्य ही सभासद परिवर्तन पॅनेलची मोठी जबाबदारी ठरणार आहे. सहकार क्षेत्रामध्ये होणारे बदल आणि बँक टिकवणे यासाठी आता परिवर्तन हाच एकमेव मार्ग आहे. हा मार्ग सर्व शिक्षक सभासदांनी निवडलेला आहे. बँकेच्या निवडणुकीत साडेचारशे अर्ज दाखल केले. त्यापैकी फक्त ५९ अर्ज शिल्लक राहिले परिवर्तन पॅनलचे २१ उमेदवार हे अभ्यासू व सक्षम आहेत. त्यांना बँकेचे माजी अध्यक्ष ज. शा. यादव यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढवून तसेच मार्गदर्शन करणारे नेतेगण मंडळी हे बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवून असल्यामुळे पारदर्शकता व विश्वासार्हता याच दोन गुणावर बँकेचे कामकाज होणार आहे.
दरम्यान, सध्या प्रचार यंत्रणेमध्ये शिक्षक सभासद व त्यांच्या परिवर्तन पॅनेलला भरघोस पाठिंबा मिळत असून मताधिक्याने येणारे सर्व उमेदवार हे बँकेचे विश्वस्त म्हणून आपली जबाबदारी समर्थपणाने पार पाडतील याबद्दल कुणाचे मनात शंका नाही ‘भाकरी पलटी केली नाही तर ती करपते ”’सध्या तर शिक्षक बँकेत चूलच बदलण्याची भाषा होऊ लागली आहे. खरं म्हणजे ही वेळ ज्या सदत्ताधाऱ्यांनी आणली आहे त्यांनी पॅनल टाकण्याचे धाडस केले ते करायला नको होते हे निकालाने स्पष्ट होईल अशी चर्चा आता पासूनच दबक्या आवाजात सुरू झाली आहे.