लोणी काळभोर : जुन्या वादाचा राग मनात धरून दोन टोळक्याने लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात दहशत माजवून 5 गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.23) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मिडीयावरही व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन्ही टोळीतील 13 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राणी महादेव कामठे (वय-45, खैरे वस्ती, लोणी स्टेशन कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चंदशेखर ऊर्फ पिल्या चोरमले (रा. माळीमळा, लोणी काळभोर), किरण अण्णा चव्हान (रा. खोकलाई चौक, लोणी काळभोर, ता. हवेली), आशिष उर्फ सोन्या रविंद्र झेंडे (रा. इंदीरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली,) अतिष विनोद झेंडे (रा. इंदीरानगर, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि.पुणे) रोहित महादेव पाटील, रा. खोकलाई चौक, लोणी काळभोर) यश जैन (रा.संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रवींद्र साहेबराव झेंडे (रा. इंदीरानगर, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अविनाश कामठे, प्रसाद इसाथ बेटीथोर, अक्षय पवार, गणेश घोडसे, शुभम (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) व त्याच्या सोबत असणारे दोन अनोळखी इसम असे एकूण 13 जणांवर आर्म अॅक्टसह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, फिर्यादी राणी कामठे या घरी असताना, शनिवारी (ता.22) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चंदशेखर ऊर्फ पिल्या चोरमले व त्याचे पाच साथीदारआमच्या घराजवळ आले. आरोपींनी घराच्या पार्कींगमधील दोन दुचाकी गाड्या लोखंडी पालघनने फोडल्या. व घराच्या दरवाजावर लाथा व पालघन मारुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. व माघारी जाताना, अविनाश कामठे याचा मर्डर आम्हीच करणार असे म्हणून हवेत लोखंडी पालघन फिरवून दहशत निर्माण केली.
दुसऱ्या घटनेत, रवींद्र झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आशिष उर्फ सोन्या व अविनाथ कामठे यांचा मागील काही दिवसापूर्वी वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून अविनाथ कामठे व त्याच्या सात साथीदार हे इंदिरानगर परिसरात आले. आरोपींनी घरासमोरील गाड्या फोडल्या. व माघारी जाताना आरोपींनी हवेत लोखंडी पालघंन फिरवून मुलाला मारुन टाकतो असे मोठमोठ्याने ओरडत परिसरात दहशत निर्माण केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांवर भारतीय हत्यार कायदा कायदा कलम 4 (25) यासह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गाड्यांची तोडफोड करताना टोळके सीसीटीव्ही कॅमेरात कैद
दोन्ही टोळक्याच्या हातात पालघनसारखे हत्याचे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत आहेत. टोळक्याने लोणी काळभोर व कदमवाकवस्तीत गाड्या फोडून हवेत हत्यार फिरवून परिसरात दहशत निर्माण केली आहे. मात्र टोळक्याच्या भांडणाच्या नादात नागरिकांच्या 5 गाड्यांचे विनाकारण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.