दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. याकडे लक्ष दिल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. त्यातच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तणाव हा येतच असतो. त्यामुळे नियमित व्यायाम केल्यास अॅक्टिव्ह राहता येऊ शकतं.
साधारणपणे वृद्धापकाळात माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली असतोच. त्याचा शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत ते सुखी जीवनापासून वेगळे होतात. त्यामुळे कुटुंबीयांना त्यांना हाताळताना खूप त्रास सहन करावा लागतो. सतत चिंता, चिडचिड, पचनाच्या समस्या, झोपेचा त्रास, शारीरिक वेदना आणि वेदनांमध्ये वाढ, वारंवार डोकेदुखी आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.
ध्यान केल्यास आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते. या दोन्ही पद्धती चिंतेचा सामना करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. याद्वारे तुम्हाला शांतता मिळेल आणि आराम वाटेल. दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्यास सकारात्मक फरक दिसू शकेल. तुमच्या वयानुसार आणि आरोग्यानुसार व्यायाम करावा. हळूहळू सुरुवात करावी.
आरामदायक परिस्थिती उद्भवल्यास वेळ वाढवता येईल. व्यायामामुळे केवळ शारीरिकच फायदा होणार नाही, तर मानसिक आरोग्यही सुधारेल. गरज भासल्यास तज्ज्ञांची सेवा घेऊ शकता. व्यायाम हा तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.