मुंबई : महाराष्ट्र सरकारने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पोलीस भरती जाहीर केली आहे. आता अनेक मैदानावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला आहे. दरम्यान, जिथे पाऊस आहे, तिथे पोलीस भरती प्रक्रिया राबवण कठीण असणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली.