कोलकाता : बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता बुधवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाली. कोट्यवधी रुपयांच्या रेशन वितरण घोटाळ्याच्या सुरू असलेल्या तपासासाठी ईडीच्या कोलकाता कार्यालयात पोहचली आहे. या संपूर्ण प्रकरणात एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, अभिनेत्रीला ईडीने तिच्या बँकेशी संबंधित काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.
ईडीने बँक खात्यांचे तपशील मागितले
ईडीच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “आमच्याकडे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे अभिनेत्रीने द्यायची आहेत,” आम्हाला इतर तपशीलांची पुष्टी करायची आहे. विशेषत: तिच्या बँक खात्यांद्वारे केलेल्या व्यवहारांची आम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. त्या व्यवहारांचे पैसे कोठे पाठवले गेले याची देखील माहिती घ्यायची आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी अभिनेत्रीला याच प्रकरणात 5 जून रोजी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी वैयक्तिक कारणास्तव अमेरिकेत असलेल्या रितुपर्णा सेनगुप्ता ईडी अधिकाऱ्यांना चौकशीला येण्यासाठी नंतरची तारीख देण्याची विनंती केली होती. 2019 मध्येही, रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने रितुपर्णा सेनगुप्ताची चौकशी केली होती.