पिंपरी (पुणे) : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने मुळशी तालुक्यातील कासारसाई येथून अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १७) दुपारी करण्यात आली. चैतन्य उर्फ संदीप परशुराम मानके (वय २२, रा. कासारसाई, ता. मुळशी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चैतन्य मानके याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने चैतन्य मानके जीता अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.