मुंबई : महाराष्ट्रातील डॅशिंग सरकारी अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेले IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली केली आहे. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार विभागाचे (मुंबई) विकास आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बदलीसंदर्भातील अधिकृत पत्रात सांगण्यात आलं आहे की, शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार, भाप्रसे यांच्याकडून सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारावा.
तुकराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी असून आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. ज्या विभागात त्यांची बदली होती तेथील कर्मचाऱ्यांना नेहमीच त्यांच्या शिस्तीचा धाक असतो. पण त्यांचा हाच कडक स्वभाव अनेकदा त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करतो आणि यामुळे त्यांची अनेकदा बदलीही झाली आहे. तुकाराम मुंढे यांची गेल्या 18 वर्षात जवळपास 21 वेळा बदली झाली आहे.