पुणे : पुण्यातील ‘अलर्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट’मध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
‘अलर्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट’मध्ये अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या प्रक्रियेंतर्गत प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, भौतिक संचालक, ग्रंथपाल या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 24 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, भौतिक संचालक, ग्रंथपाल.
– एकूण रिक्त पदे : 61 पदे.
– नोकरी ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 जून 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2024.
– अर्ज करण्याचा पत्ता : सेक्रेटरी, अलर्ड चॅरिटेबल ट्रस्ट, अलर्ड नॉलेज पार्क एस. नं. 50, हिंजवडीजवळ, मनिंजी पुणे – 411057.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : Info@alardinstitutes.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://alardcollegeofengineering.com/ वरून माहिती घेता येणार आहे.