मुंबई : मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघातील लोकसभेचा निकाल देशात चर्चिला गेला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला होता. परंतु आता या निकालानंतर एक मोठा ट्वीस्ट बघायला मिळत आहे. निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागलेला असला तरी, एका मागोमाग एक खळबळजनक बाबी समोर येत आहे.
मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघात जोरदार लढत बघयला मिळाली. शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. पण हा निकाल उद्धव ठाकरे गटाने अजून ही स्वीकारलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी ठाकरे सेनेने सुरु केली आहे. आता या निकालात एक मोठा ट्वीस्ट आला आहे.
वायकरांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा
मतमोजणीबाबत ठाकरे सेनेचे अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तपासात धक्कादायक खुलासा
वायकरंच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन EVM मशीनला जोडलेला होता. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन करण्यात अनलॉक आली होती. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे. मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी हा फोन जप्त केल असून, तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. प्रकरणात गुरव आणि पंडीलकर यांना ४१(अ) ची नोटीस बजावली आहे. त्यांना हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता, हे समोर येनार्त आहे. वनराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून एंट्री पाँईट, स्ट्राँग रुम अशा महत्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज मागितले आहे. त्याआधारे पोलीस पुढील तपास करणार आहे.