पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शनिवारी सकाळी अचानक पाटण्यातील सर्वात मोठ्या खासगी रुग्णालयात पोहोचले. त्यांच्यावर ऑर्थो विभागात उपचार सुरू असल्याचे, सांगितले जात आहे. सकाळी उठल्याबरोबर सीएम नितीश कुमार यांना हातामध्ये खूप वेदना होऊ लागल्या. यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेत खासगी हॉस्पिटल गाठले. सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती उत्तम आहे. ऑर्थो विभागाचे वरिष्ठ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.