सिक्कीम : सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने सिक्कीम राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात संततधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे १५ परदेशी नागरिकांसह १२०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. या भूस्खलनात काही व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेत सोमवारी ३ जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांची संख्या ९ वर गेली आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवार सांयकाळपर्यंत सिक्कीमध्ये आलेले १२०० हून अधिक पर्यटक यामध्ये अडकले होते. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, जवळवास १२०० हून अधिक पर्यटक हे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. सिक्कीम पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे प्रधान सचिव सी एस राव यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मंगन जिल्ह्यातील लाचुंगमध्ये भारतातील ३, बांगलादेशातील १० जण अडकले आहेत.
संपूर्ण वाहतुक व्यवस्था विस्कळीत
सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनामुळे संपूर्ण वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक भागातील घरांची पडझड ही झालेली आहे. दक्षिण सिक्कीमधील दमथांग तसेच पश्चिम सिक्कीममधील ग्लालशिंग आणि गंगटोक यासारख्या अनेक भागात तेरा दिवसांच्या कालावधीत ३० मिमी ते ५० मिमी पर्यंत पाऊस पडला आहे. IMD नुसार, यावर्षी १३ दिवसांत तब्बल २५० मिमी पावसाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.