Health Tips : आपलं आरोग्य जपायचं असेल तर आपल्याला योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी कोणती फळं वा पदार्थ आपल्या सेवनात असावी हे माहिती असायला हवं. आज आपण अक्रोडच्या सेवांमबद्दलजाणून घेऊ या. अक्रोड मेंदू आणि आरोग्यासाठी फायद्याचे जाते. अक्रोडाचे सेवन आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.
अक्रोड जे आरोग्यासाठी फायद्याचे असले तरी याचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे. अक्रोड हे मानसिक आरोग्याच्या समस्यांवर औषधासारखे काम करते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते जे मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
अक्रोड हे ड्राय फ्रूट अनेक गुणांनी संपन्न आहे. मेंदूसाठी हे सुपर फूड मानले जाते. हा ड्राय फ्रूटचा आकार मेंदूसारखा असतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. जे मेंदूलाही तीक्ष्ण बनवतात. यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी 12 हे मेंदूसाठी आवश्यक आहे. तसेच यात इतर घटक जसे की फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि तांबे दररोज खाणे तुमच्या मेंदू आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अक्रोड सेवनाचे फायदे
- अक्रोडाचे सेवन हे हाडे मजबूत करण्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये असलेले अल्फा लिनोलेनिक ॲसिड हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.
- अक्रोडचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. याच्या सेवनाने भूक नियंत्रित राहतो. यामुळे चयापचय वाढू शकते, ज्यामुळे कॅलरीज जलद बर्न होतात.
- अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक असतात. जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, बी12, फोलेट, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतात.
- अक्रोडमध्ये उच्च अँटिऑक्सिडंट्स असतात याशिवाय चांगले फॅट्स असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जातात. अक्रोडच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.