नवी दिल्ली : ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’ अर्थात एनसीएलटीने बंद पडलेली विमान कंपनी ‘गो फर्स्ट’ला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीला दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 60 दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. कंपनीकडून खरेदीदाराचा शोध सुरु असून, आता याच प्रक्रियेला वाढीव कालावधी मिळाला आहे.
कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया (सीआयआरपी) पूर्ण करण्यासाठी गो फर्स्टला दिलेला हा चौथा विस्तार आहे. यापूर्वी, दिवाळखोरी न्यायाधिकरणाने 8 एप्रिल रोजी 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार, ती मुदत 3 जून 2024 रोजी संपली होती. ‘गो फर्स्ट’ला आता 3 ऑगस्ट 2024 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
तसेच ज्यांनी एअरलाईन खरेदी करण्यात रस दाखवला आहे, त्यांनी त्यांच्या ऑफर सुधारित केल्या आहेत आणि कर्जदारांनी अद्याप त्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे 60 दिवसांची मुदतवाढ आवश्यक असल्याचे म्हटले होते. यावरूनच हा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.