सांगली : राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या त्यात राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला. आता राज्यात सर्व पक्षांनी आता आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. जागावाटप, उमेदवारांची चाचपणी यासाठीही खलबतं सुरू झाली आहेत. लोकसभेमध्ये मिळवलेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसत आहे.
आता पुन्हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होईल, असं चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी विधानसभेसाठी किती जागांवर आपले शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उतरविणार आहेत ? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. यासाठी कारण ठरलव ते म्हणजे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं विधान. राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
लोकसभेतील यशानंतर आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं चांगलीच तयारी सुरु केली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी नुकतंच स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. तर, दुसरीकडे लोकसभेत महाविकास आघाडीतील इतर पक्षांपेक्षा जास्त जागा मिळवल्यानं काँग्रेस विधानसभेतही सर्वाधिक जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच शरद पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. पण हे वक्तव्य करताना जयंत पाटलांनी जागांचा आकडा मात्र स्पष्ट केला नसल्याचं पाहायला मिळालं.
शरद पवार गट ‘इतक्या’ जगावर निवडणूक लढवणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हटले की, “आता साडेतीन-चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आम्ही सर्वच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल, असं वाटत नाही. त्यामुळे काय करायचंय ते तुम्हीच करायचं आहे. कारण लोकसभेत मी दहा मतदारसंघ फिरलो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही.” पुढे बोलताना जयंत पाटलांनी विधानसभेच्या जागांबाबचा आकडा सांगणं टाळत म्हणाले कि आणि म्हणाले की, आकाड घेतला तर टीव्हीवर सुरू होईल, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार, म्हणून मी आकडा घेत नाही.
महायुतीत ‘इतक्या’ जागांवर राष्ट्रवादीचा दावा
राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणावर जागा लढवणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं असतानाच, दुसरीकडे महायुतीतही विधानसभेच्या जागावाटपावरुन खलबतं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी 80 जागांवर दावा केला आहे. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 80 जागांवर लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं.