उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील श्रीकृष्ण महानुभाव मंदिराचे मुख्य व्यवस्थापक श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठाणचे मुख्य विश्वस्त महंत विद्याधर शहापूरकर यांच्या दूरदृष्टीतुन सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे भव्य दिव्य श्रीकृष्ण महानुभाव मंदिर ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभारण्यात येत आहे. त्यामुळे या तीर्थस्थळांचे स्वरूप आकर्षक झाले असून भाविकांसाठी सोयीसुविधा करण्यात येत आहेत.
लोकजागृती होऊन धर्म प्रचार प्रचार तत्त्वज्ञान वाढीस लागून तरुणांना आध्यात्मिक ओढ निर्माण होऊन आपल्या संस्कृती परंपरेचे जतन व्हावे. तरुणांना योग्य संस्कार घडावेत यामधून सुसंस्कृत भावी पिढी उदयास यावी. तसेच व्यसन मुक्ती समाज घडावा. नित्यनेमाने पुजा अवसर, धार्मिक विधी घडावा. धावपळीच्या जीवनात कुठेतरी मन स्थिर ठेवल्यास मन प्रसन्न होते. या निरपेक्ष भावनेतून कोरेगाव मूळ या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आले आहे.
दरम्यान, श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठाणचे सर्व पदाधिकारी, सदभक्त व ग्रामस्थ यांचे ही योगदान आहे. कोरेगामुळच्या वैभवात यानिमित्ताने निश्चितच भर पडणार आहे. वृद्ध आश्रमची उभारणी याठिकाणी होणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त महंत विद्याधर शहापूरकर यांनी दिली.