नवी दिल्ली : सध्या नवनवीन टेक्नॉलॉजीचे गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार कंपन्याकडूनही उत्पादन केले जात आहे. असे असतानाच आता HMD Global ने आपला बेस्ट असा HMD T 21 हा टॅबलेट लाँच केला आहे. यामध्ये 8200 mAh बॅटरीसह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
HMD T 21 या टॅबलेटमध्ये Nokia T21 प्रमाणेच स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. यात 2000 x 1200 पिक्सेल रिझोल्यूशनसह 10.36-इंचाचा IPS डिस्प्ले आहे. स्टिरिओ स्पीकरसह डिस्प्ले चित्रपट आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वोत्तम आहे. तसेच डिस्प्ले WGP किंवा AES 2.0 रँकचा वापर करून स्टायलस इनपुटला सपोर्ट देतो. हा टॅबलेट Android 13 सह येतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 5 आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकही देण्यात आला आहे. यात Unisoc T612 प्रोसेसर असून, जो Nokia T21 मध्येदेखील पाहिला मिळू शकतो. या टॅब्लेटमध्ये 8200 mAh बॅटरी असून, ज्यातून 3 दिवसांपर्यंत बॅकअप मिळू शकतो.