पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धाराशिव (उस्मानाबाद) येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही देखील नोकरीसाठी इच्छुक असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, धाराशिव (उस्मानाबाद) येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला धाराशिव (उस्मानाबाद) येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पदांसाठी 11 जून 2024 पासून अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे तर 14 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय धाराशिव येथे अर्ज पाठवावा. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://osmanabad.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.