पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESIC मध्ये रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 17 रिक्त पद भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 17 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र).
– शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. आणि बी.ए.एम.एस.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, क्रिस्टल प्लाझा, ३८ ए, ताराबाई पार्क, कोल्हापूर ४१६००३.
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल : establish.kop@gmail.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.esic.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.