मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी 8 जूनपासून पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे करू. तसेच विधानसभेला आम्ही आता थेट उमेदवाराच नाव घेऊन पाडू. असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मागच्या वेळी सुद्धा आम्ही त्यांना जे आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे केसेस परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. असंही ते म्हणाले आहेत. त्यांची मागणी आहे त्याबाबतदेखील सरकारने पहिली नोटिफिकेशन जारी केलं असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाल कि, मी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहे. “मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. छगन भुजबळ यांच्याशीदेखील चर्चा करून मी त्यांना समजावून सांगणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे. त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यात बसणारं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.