नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक कंपन्यांकडून स्मार्टफोन्सची निर्मिती केली जाते. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Nokia ने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केले आहे. नोकियाने आपला नवा कोरा असा Nokia 3210 लाँच केला आहे. यामध्ये स्मार्टफोनसारखेच फिचर्स देण्यात आले आहेत.
नोकिया फोन निर्माता कंपनी HMD Glabal ने हा फोन मार्केटमध्ये आणला आहे. पण, आता या फोनमध्ये अनेक अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत. यात यूट्यूब, यूपीआय पेमेंट अशा अनेक नवीन गोष्टींचा समावेश आहे. या फोनमध्ये 2.4 इंच स्क्रीन असून, तो Unisoc T107 प्रोसेसरवर चालतो. Nokia 3210 4G तीन कलर पर्यायांमध्ये येतो. या फोनमध्ये तोच जुना कीबोर्ड आहे ज्यामध्ये अक्षरांसह अंक असायचा आणि लोकप्रिय गेम Snake देखील आहे.
नवीन Nokia 3210 4G हा फोन ग्राहकांना परवडणाऱ्या अशा किंमतीत मिळणार आहे. सध्या या फोनची किंमत 3,999 रुपये अशी असणार आहे. हा फोन HMD च्या अधिकृत वेबसाईट आणि Amazon सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे.