Health tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजन विविध प्रयोग करत असतात. त्या एक उपाय केला जातो म्हणजे पोटभर जेवण न करणे. परंतु अशा प्रकारे नेहमीच भूक मारल्याने खरच वजन कमी होतं का? तर चला बघू वजन कमी करायला भूक न मारता काय करायला हवं. लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात चार अशा काही गोष्टींचा समावेश करा. ते चार पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचं वजन वाढणार नाही. ‘हे’ पदार्थ कोणते आहेत ते जाणून घ्या.
१)काकडी
सर्वात पहिला नंबरवर आहे ती म्हणजे काकडी. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा आहारामध्ये समावेश करा. काकडी खाल्ल्याने तुमची भूक भागेल. काकडीमध्ये कमी प्रमाणात उष्णता असते. त्यासोबतच त्यामध्ये फायबर असते आणि काकडी खाल्ल्याने पाण्याची कमी देखील भरून निघते.
२) मखाणा
मखाणा तुम्ही नाश्त्यामध्येही खाल्लात तर हासुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. भूक लागली असताना जर तुम्ही मखाणा खाल्लात तर तो आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. वजन कमी करण्यासाठी मखाणा चांगला पर्याय आहे.
३) मिक्स सॅलड
वजन कमी करण्यासाठी जेवणाची वेळ सोडून, ज्या वेळेत तुम्हाला भूक लागते तेव्हा मिक्स सॅलडचा खाण्यामध्ये समावेश हा सुद्धा एक चांगला आणि सोपा उपाय तुम्ही करू शकता. मिक्स सॅलडमध्ये तुम्ही टोमॅटो, काकडी आणि लेट्युस खाऊ शकता. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे वनज कमी कऱण्यासाठी ते फायदेशीर ठरतं आणि आपली भूकही भागून जाते.
४) टरबूज
काकडीनंतर टरबूज म्हणजेच आपण त्याला कलिंगडही बोलतो. कलिंगड खाल्ल्याने तुमचं पोटही भरते आणि सोबत वजनही कमी होते. भूक लागल्यावर एक प्लेट कलिंगड खाल्ले तर त्याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. कमी कॅलरी आणि फायबरचेही प्रमाण कलिंगडमध्ये असते.