शिक्रापूर : पारोडी (ता. शिरूर) येथे कृषी विभागामार्फत पिक तंत्रज्ञान मोहीम अंतर्गत ऊस लागवड तंत्रज्ञान व हुमणी नियंत्रण या विषयावर कृषी सहाय्यक जयवंत भगत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ९ जून रोजी पिक तंत्रज्ञान व हुमणी नियंत्रण एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.
ऊस लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन
ऊस लागवड करताना लागवडीच्या आधीची जमीन मशागत तसेच सेंद्रीय अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन पद्धती, बेणे प्रक्रिया करणे, सेंद्रिय व रासायनिक खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, आंतर पिके, जिवाणूचा वापर, पाणी व्यवस्थापण, संजीवकाव्या फवारणी, बेसल डोस चे महत्व तसेच कमी खर्चात उत्पादनात वाढ कशी करायची या विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले.
हुमणी अळी बद्दल माहिती व नियंत्रण उपाय
कमी पाऊस झाल्यास ऊस पिकात हुमणी अळीचे भुुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे आवश्यक आहे.
जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके खाऊन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते. नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतक-यांच्या लक्षात येते. तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते. अशावेळी हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याअधीच जून महिन्यातच हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
हुमनी नियंत्रणबाबत प्रकाश सापळा, बी व्ही एम चा, ई पी एन चा वापर करून नियंत्रण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
कृषि सहाय्यक संध्या सांडभोर यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी योगदान दिले. तसेच हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा लावण्याचे आवाहन केले.
यावेळी पारोडी गावचे शेतकरी ,ग्रामस्थ शिवाजी टेमगिरे, संभाजी टेमगिरे, आबासाहेब ढमढेरे, अविनाश येळे, लालासाहेब येळे, रविराज टेमगिरे, विशाल ढमढेरे, ज्ञानेश्वर टेमगिरे, नवनाथ टेमगिरे, दिगंबर ढमढेरे, मोहन भालेकर, गणेश टेमगिरे, स्वराज साकोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते
या एकदिवसीय कार्यशाळेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी सुशांत टेमगिरे यांनी सूत्रसंचालन केले व संभाजी टेमगिरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.