Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आज संध्याकाळी सव्वा सात वाजता दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते. तर नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला असून गृह आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ?
1. अमित शाह
2. राजनाथ सिंह
3. नितीन गडकरी
4. निर्मला सीतारमन
5. जे.पी. नड्डा
6. एस जयशंकर
7. मनोहरलाल खट्टर
8. कुमारस्वामी
9. पियुष गोयल