उरुळी कांचन, (पुणे) : अलिशान गाडीतून आलेल्या 3 ते 4 जणांनी घरासमोर लावलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून 22 हजार 500 रुपये किमतीचे 250 लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ शुक्रवारी (ता. 07) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी करण भागवत जवरे (वय 25, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट रा. जि.प.शाळेजवळ, सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण जवरे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्याकडे ट्रक आहे. शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरासमोर त्यांनी ट्रक लावून घरी झोपले होते. यावेळी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 जण एका इंडिगो चारचाकी गाडीतून खाली उतरले. यावेळी त्यांनी घरासमोर लावलेल्या ट्रकचे डीझेल टाकीचे लाँक व मिटरगेज तोडुन टाकीतील 250 लिटर 22 हजार 500 लिटर किमतीचे लिटर चोरून नेले.
दरम्यान, शेजारी राहणारे दत्ता चोथे व दत्ता भिसे यांचे वाहणाचे डिझेलचे टाकीचे झाकण तोडुन डिझेल चोरीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अज्ञात 3 ते 4 जणांच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.