नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनसह लॅपटॉपचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, कंपन्यांकडूनही आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गॅजेट्स आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच प्रसिद्ध कंपनी Acer ने आपला AI टेक्नॉलॉजी असणारा Acer Swift 14 हा लॅपटॉप लाँच केला आहे. हा लॅपटॉप एक बेस्ट लॅपटॉप असा असणार आहे.
Acer Swift 14 या लॅपटॉपमध्ये 32 GB RAM सह अनेक जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत. एसरचा हा पहिला CoPilot + लॅपटॉप आहे. त्यातील NPU 45 ट्रिलियन ऑपरेशन्स प्रति सेकंद (TOPS) मिळतो. यामुळे AI आधारित कार्यासाठी परिपूर्ण होते. कंपनीने लॅपटॉप Qualcomm Snapdragon एक्स एलिट आणि Qualcomm Snapdragon X प्लस प्रोसेसरसह मिळणार आहे. यामध्ये रिकॉल, कोक्रिएटर, लाईव्ह कॅप्शन आणि इतर अनेक महत्त्वाचे फिचर्स देण्यात आले आहेत.
यात 14.5 इंचाचा IPS डिस्प्ले असून, जो 120Hz रिफ्रेश रेटसह 2560×1600 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. डोळ्यांच्या कम्फर्टसाठी हे TUV Rhineland EyeSafe प्रमाणित आहे. यात Qualcomm Hexagon NPU, टचस्क्रीन पर्याय आणि Qualcomm Adreno GPU आहे. लॅपटॉपमध्ये 32GB पर्यंत ड्युअल-चॅनल LPDDR5X-8533 SDRAM आणि 1TB पर्यंत PCIe Gen4, NVMe स्टोरेज आहे.
तसेच या लॅपटॉपमध्ये QHD IR कॅमेरा असून, जो प्रायव्हसी शटर आणि ट्रिपल माईकला सपोर्ट करतो. यात DTS X ऑडिओसह ड्युअल स्पीकर सेटअप आहे. यात 75 Wh 3-सेल Li-ion बॅटरी आहे जी जलद चार्जिंगला सपोर्ट करते. याच बॅटरीच्या मदतीने 16 तासांचा बॅकअप मिळवता येऊ शकतो. या लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ 5.4 आणि वायफाय 7 सपोर्टही मिळतो.