पुणे : बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशिररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १७ जणांवर गुन्हा दाखल केला. यावेळी त्यांच्याकडून २५ हजारांची रोकड १६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताडीवाला रोड परिसरात बेकायदेशीरपेण जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली होती .
यावेळी पथकाने पाळत ठेऊन छापा टाकत १७ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींना पुढील तपासासाठी बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अमंलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे मनिषा पुकाळे, हनमंत कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.