पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण घरात वावरताना काळजी घेतली पाहिजे. पण कामाच्या गडबडीत अनेकदा असं होतं नाही. परिणामी, घरात होणाऱ्या अपघातांना बळी पडू शकतो. कळत न कळत होणारे हे अपघात अनेकदा आपल्या जीवावरही बेतू शकतात. त्यामुळे याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.
घरगुती अपघातांपासून स्वतःला वाचवण्यासाठी न घसरणाऱ्या चप्पल अथवा बुटांचा वापर करावा. घरातील निसरड्या जागांची नियमितपणे साफसफाई करावी. कान व डोळे यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करावी. तसेच नियमित व्यायाम करणे, ऑस्टिओपोरेसिस, संधिवात सारख्या आजारांवर योग्य उपचार करावेत. त्याने चांगला परिणाम दिसू शकतो. घरात पुरेसा प्रकाश असावा. झोपायची खोली, बाथरुम, जिना, हॉल येथे नाईट लॅम्प असावेत.
याशिवाय, कार्पेटला जमिनीला फिक्स करावे. बाथरूम अथवा टॉयलेटमध्ये हात पकडण्यासाठी बारची व्यवस्था करावी. जिन्याच्या दोन्ही बाजूंना आधार घेण्यासाठी रेलिंग असावेत, अशा गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.