पुणे : देशासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभ मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी 1 लाख 53 हजार 960 मताधिक्य घेऊन दणदणीत विजय प्राप्त केला आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंचं आता गावोगावी मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना उद्देशून घोषणाबाजीही करण्यात आली. “दादाला सांगा ताई आली… वहिनीला सांगा ताई आली” असे म्हणत पुण्यातील सुप्रिया सुळे समर्थकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह समर्थकांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद झळकत होता.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आज सुप्रिया सुळेंचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. सुप्रिया सुळेंवर जेसीबीमधून फुलांची आणि गुलालाची उधळण करत आनंद साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांचा मोठा दबदबा आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रथमच पुण्यातही पवार विरुद्ध पवार असे दोन गट पडले होते. त्यातूनच, सुनेत्रा पवार यांच्यासाठी आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी झटणारा कार्यकर्ता दोन गटांत विभागला गेला होता. आता, खासदार सुप्रिया सुळेंनी बाजी मारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
“दादाला सांगा ताई आली… वहिनीला सांगा ताई आली” pic.twitter.com/FbaVixR7xI
— Omkar Wable (@omkarasks) June 6, 2024
;