नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल सकाळपासून जाहीर होण्यास सुरुवात झाली. आता मंगळवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत ‘गुगलवर नेटकऱ्यांनी नेमके काय शोधले याची माहिती पुढे आली आहे. अनपेक्षितपणे दिवसभर नेटकऱ्यांचा कटाक्ष आंध्रप्रदेशच्या निकालाकडे होता.
तिथे चंद्राबाब नायडू यांनी ‘कम बँक’ केले आहे. तिसऱ्या क्रमाकांवर भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागून असलेल्या वाराणासीच्या निकालाचा शोध घेण्यात आला. लोकसभा निवडणूकीबाबत नेटकऱ्यांनी दिवसभर नक्की काय शोधले याची माहिती गुगलने कंपनीच्या सर्च इंजिनने सांयकाळी दर्शवली. त्यात आंध्रप्रदेशच्या निकालाची माहिती जवळपास १० लाख नेटकऱ्यांनी शोधली आणि वाचली.