पुणे : अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवांरांचा पराभव केला. शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या लढतीत बारामती कोणाची? याचा निकाल बारामतीकरांनी एकदाचा लावला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी मोठी आघाडी घेतली. सर्वात महत्वाचे म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात, त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी 47 हजाराहून जास्त मतांची आघाडी घेतली आहे. अजित पवार यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर राज्यात झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार हे आपल्या पक्षासाठी नवीन चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे गेले. त्यानंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले. मात्र अजित पवारांचा हा निर्णय पवार कुटुंबीयांसह बारामतीकरांनाही आवडला नसल्याचे आता निकालातून स्पष्ट झाले आहे. सर्व नेते अजित पवारांसोबत, पण जनता मात्र शऱद पवारांसोबत असं चित्र सर्वच ठिकाणी दिसून आले.
बारामती मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी
एकूण झालेले मतदान – 14 लाख 12 हजार 875
सुप्रिया सुळे यांना झालेले एकूण मतदान – 7 लाख 32 हजार 312
सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान – 5 लाख 73 हजार 979
दौंड विधानसभा (आमदार राहुल कुल- भारतीय जनता पक्ष)
सुप्रिया सुळे -92 हजार 64
सुनेत्रा पवार – 65 हजार 727
(सुप्रिया सुळे यांना 26 हजार 337 मतांची आघाडी)
इंदापूर (आमदार दत्ता भरणे- राष्ट्रवादी काँग्रेस)
सुप्रिया सुळे – 1 लाख 14 हजार 20
सुनेत्रा पवार – 88 हजार 69
(सुप्रिया सुळे यांना 25 हजार 951 आघाडी)
बारामती ( आमदार अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस)
सुप्रिया सुळे -1लाख 43 हजार 941
सुनेत्रा पवार – 96 हजार 560
(सुप्रिया सुळे यांना 47 हजार 381 मतांची आघाडी)
पुरंदर (आमदार संजय जगताप- काँग्रेस)
सुप्रिया सुळे -1लाख 25 हजार 948
सुनेत्रा पवार – 90 हजार 667
(सुप्रिया सुळे यांना 35 हजार 281 मतांची आघाडी)
भोर (आमदार संग्राम थोपटे- काँग्रेस )
सुप्रिया सुळे -1लाख 34 हजार 245
सुनेत्रा पवार – 90 हजार 440
(सुप्रिया सुळे यांना 43 हजार 805 मतांची आघाडी)
खडकवासला (आमदार भीमराव तापकीर- भाजप)
सुप्रिया सुळे – 1 लाख 21हजार 182
सुनेत्रा पवार – 1 लाख 41हजार 928
( सुनेत्रा पवार यांना 20 हजार 746 मतांची आघाडी)
सुप्रिया सुळे यांना मिळालेली एकूण आघाडी – 1 लाख 58 हजार 333